Vitthal Rukmini Varkari Vima Chhatra Yojana 2023, PDF, अर्ज, GR नमस्कार मित्रांनो मराठी योजना मध्ये तुमचं स्वागत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र या योजनेची सुरुवात केली आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पंढरपूरला येत असतात. हे वारकरी पंढरपूरच्या दिशेने जात असताना एखाद्या वारकऱ्यांचा मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास तर अशा वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र ही योजना चालू केली आहे
या योजनेच्या माध्यमातून वारकरी किंवा त्यांच्या वारसदारस मदत दिली जाणार आहे. तर चला पाहूया नक्की विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना 2023 आहे तरी काय व त्याचा लाभ आपण कसा घेऊ शकतो संपूर्ण योजना समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना 2023 संपूर्ण माहिती मराठी
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पंढरपूर येथील वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना 2023 याची सुरुवात केलेली आहे ही योजना राबवण्यासाठी Iffco-Tokio General Insurance Co. Ltd या विमा कंपनीची निवड केलेली आहे आषाढी वारीकरिता पंढरपुरात येणाऱ्या सुमारे पंधरा लक्ष वारकऱ्यांसाठी या योजनेची तरतूद केलेली आहे. तसेच या योजनेअंतर्गत अपघाता दरम्यान वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास एक लाखाचा विमा व चार लाख इतकी रक्कम शासनाकडून देण्यात येणार आहे.
योजनेचे नाव | विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना |
कोणी सुरुवात केली | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील वारकरी |
उद्देश | अपघात ग्रस्त वारकऱ्यांना विमा प्रदान करणे |
राज्य | महाराष्ट्र |
योजनेची सुरुवात | 21 जून 2023 |
वारकऱ्याचा अपघात झाल्यास किती रक्कम मिळणार
या योजनेअंतर्गत एखाद्या दुर्घटनेत किंवा अपघातात वारकऱ्याचा मृत्यू झाला किंवा कायमचे अपंगत्व व विकलांगता आल्यास तसेच हात पाय डोळे निकामी झाल्यास या व्यतिरिक्त वैद्यकीय उपचारासाठी ही काही रक्कम वारकऱ्यास दिले जाणार आहे ते खालील प्रमाणे
मृत्यू झाल्यास | पाच लाख |
कायमचे अपंगत्व | एक लाख |
अंशिक अपंगत्व | पन्नास हजार |
वैद्यकीय उपचार | पस्तीस हजार |
विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना पात्रता
- ही योजना आषाढी वारी 2023 करिता पंढरपूर येथे पायी अथवा खाजगी व सार्वजनिक वाहनाने जाणाऱ्या वारकऱ्यांकरीता लागू आहे.
- अपघात ग्रस्त वारकरी आषाढी वारी 2023 करिता पंढरपूरला गेल्याचे ज्या गावचा वारकरी आहे तेथील संबंधित तहसीलदार यांचे प्रमाणपत्र घ्यावे लागेल.
- खाली दिलेला PDF फॉर्म भरून जमा करणे आवश्यक आहे.
- मृत अपघाता दरम्यान मृत्यू झाल्यास अर्ज सोबत मृत्यू प्रमाणपत्र जमा करावे लागणार आहे.
विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना PDF अर्ज व GR पाहण्यासाठी इथे क्लिक करा
निष्कर्ष
आम्हाला आशा आहे की विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना 2023 याबाबतची संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखातून मिळाले असेल. मराठी योजना ही वेबसाईट केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत असते. अशाच नवनवीन येणारे योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप व व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
टेलीग्राम ग्रुप जॉईन कराविठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना FAQ
विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना काय आहे
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे जात असताना काही वारकऱ्यांचा अपघात झाल्यास त्यांना शासनाकडून विमा व आर्थिक मदत दिली जाणार आहे
वारीदरम्यान वारकऱ्यांच्या मृत्यू झाल्यास किती रक्कम भेटणार आहे
आषाढी वारी निमित्त पंढरपूर कडे जात असताना वारकऱ्याचा अपघातादरम्यान मृत्यू झाल्यास पाच लाख रुपयांची तरतूद शासनाकडून करण्यात आलेली आहे
वारकऱ्यांसाठी शासनाची कोणती योजना आहे
वारकऱ्यांसाठी शासनाची विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना आहे या अंतर्गत वारीदरम्यान वारकऱ्याचा अपघात झाल्यास त्याला शासनाकडून मदत मिळणार आहे
वारकऱ्यांना वैद्यकीय उपचारासाठी किती रक्कम दिली जाते
विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना या अंतर्गत प्रत्येक वारकऱ्याला वैद्यकीय उपचारासाठी 35 हजार एवढी रक्कम दिली जाणार आहे