नमस्कार मित्रांनो मराठी योजना मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण शासन आपल्या दारी योजना 2023 ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये shasan aaplya dari yojana लाभ, उद्दिष्टे, नोंदणी shasan aaplya dari yojana GR,PDF लोगो तसेच या अभियानांतर्गत राबवले जाणारे उपक्रम व कार्यक्रम यासंबंधी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.
योजनेचे नाव | शासन आपल्या दारी |
सुरुवात | 13 मे 2023 |
उद्देश्य | तळागाळातील लोकांपर्यंत शासनाच्या योजना पोचवणे |
लाभार्थी | प्रत्येक जिल्ह्यातील किमान 75000 सामान्य नागरिक |
शासन आपल्या दारी योजना 2023 | Shasan Aplya Dari Yojana
शासकीय योजना लोकाभिमुख करून त्याची अंमलबजावणी वेगवान करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबवण्याचे काम चालू आहे. या उपक्रमाचा उद्देश समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचवणे हा आहे. नुकतीच या अभियानाची सुरुवात सातारा जिल्ह्यातून झाली आहे.
शासन आपल्या दारी योजना उद्दिष्ट्य 2023 | Objectives of Shasan Aplya Dari Yojana
केंद्र व राज्य शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या अनेक कल्याणकारी योजनांचा नागरिकांना जलद गतीने व कोणत्याही अडथळ्याशिवाय लाभ मिळावा या अनुषंगाने शासनातर्फे शासन आपल्या दारी हा अभिनव उपक्रम राबवला जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून कमीत कमी कागदपत्रे व जलद गतीने मंजुरी च्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या योजनांचा फायदा मिळवून देण्यात येणार आहे.
जननी सुरक्षा योजना माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा
शासन आपल्या दारी योजना लाभ 2023 | Shasan Aplya Dari Yojana Benefits
- सरकारी कार्यालयाचे हेलपाटे किंवा कागदपत्रांची डोकेदुखी नाही.
- प्रत्येक जिल्ह्यात किमान 75000 लाभार्थ्यांना एकाच छताखाली लाभ मिळणार.
- शासकीय निर्धारित शुल्कात 200 हून अधिक योजनांचा लाभ घेता येणार.
शासन आपल्या दारी योजना PDF GR
शासन आपल्या दारी योजना PDF GR पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
शासन आपल्या दारी योजना कधी सुरू झाली
शासन आपल्या दारी या अभियानाची सुरुवात सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातून 14 मे 2023 रोजी याची सुरुवात करण्यात आली
शासन आपल्या दारी या योजनेची नोंदणी कुठे करावी
शासन आपल्या दारी या योजनेची नोंदणी आपण सीएससी, ‘एमएससीआयटी’ कॉम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्समधील स्वयंसेवकांची मदत घेऊन नागरिकांना नोंदणी करता येणार आहे.
शासन आपल्या दारी म्हणजे काय?
शासन आपल्या दारी ही महाराष्ट्रातील योजना आहे. याची सुरुवात मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी केली संपूर्ण महाराष्ट्रात हे अभियान राबवण्याचे काम चालू आहे
1 thought on “शासन आपल्या दारी योजना 2023 | Shasan Aplya Dari Yojana”