Pm Kisan Yojana App नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी योजना मध्ये तुमचे स्वागत आहे. Pm Kisan Yojana Mobile App हे सरकारने लॉन्च केले आहे. या ॲपमुळे बोटांचे ठसे किंवा ओटीपी याशिवाय शेतकऱ्यांना आता चेहरा स्कॅन करून ई-केवायसी करता येणार आहे. फेस ऑथेंटिकेशन म्हणजेच चेहऱ्याद्वारे ओळख प्रमाणित करण्याचे वैशिष्ट्य असलेल्या पी एम किसान योजना मोबाईल ॲप याचे उद्घाटन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केले.
मोबाईल नंबर टाकून पहा पी एम किसान योजनेचे किती किती हप्ते मिळाले
पी एम किसान योजनेच्या फायदा काही अपात्र लोक हे घेत आहेत असे मागील काही काळात निदर्शनास आले होते. या लोकांना नोटीस पाठवून पीएम किसान योजने अंतर्गत मिळालेले सर्व रक्कम परत करण्याचे आदेश दिलेले आहेत. अशी फसवणूक भविष्यात होऊ नये म्हणून सरकारने फेस ऑथेंटिकेशन असलेले ॲप आणले आहे. हे ॲप सर्वप्रथम शेतकऱ्यांचा चेहरा पडताळणार आहे त्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचे हप्ते जमा केले जाणार आहेत या ॲपमुळे पीएम किसान योजने संबंधीची फसवणूक थांबवणे सोपे होईल Pm Kisan Yojana App
टेलीग्राम ग्रुप जॉईन करा