मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 अर्ज, PDF, ऑनलाइन फॉर्म, रजिस्ट्रेशन, नमस्कार मित्रांनो मराठी योजना मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण Maharashtra Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana या महाराष्ट्र शासनाच्या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत, महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप ही योजना चालू केली आहे.
राज्यात ग्रामीण भागातील बहुतांश शेतकऱ्यांचा शेती हा व्यवसाय आहे. यासाठी महाराष्ट्र सरकार विविध योजना राबवत असते. मुख्यमंत्री सौर कृषी पंप ही योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे. सौर उर्जा हा उर्जेचा शाश्वत आणि अखंड स्त्रोत आहे. सात ते आठ महिने कडक ऊन असल्याने याचा वापर करून मुख्यमंत्री सौर कृषी पंपाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल याचा विचार करून या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 | Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana Highlights
योजनेचे नाव | मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 |
कोणी चालू केली | महाराष्ट्र शासन |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | महाराष्ट्रातील शेतकरी |
उद्देश्य | राज्याच्या शेतकऱ्यांना सोलर पंप उपलब्ध करून देणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाईट | https://www mahadiscom.in/solar |
विभाग | MSEDCL |
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 उद्दिष्ट
राज्यातील अनेक भागात शेतीसाठी पाण्याचा वापर करत असताना इलेक्ट्रिक पंप किंवा डिझेल पंप याचा वापर करत असतात. दुर्गम भागात शक्यतो डिझेल पंपाचा वापर केला जातो. डिझेल पंप महाग असल्याने तसेच या पंपासाठी लागणारे डिझेल महाग असल्याने. शेतकऱ्यांना सिंचनासाठी बराच खर्च करावा लागतो यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होते. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी पंप ही योजना चालू केली आहे.