Mumbai Rain Updates Today News : मुंबई आणि आस आसपासचच्या भागात मागील काही तासांपासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाचा मुळे पश्चिम रेल्वे आणि रस्ते वाहतुक विस्कळीत झाली आहे. अनेक रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्याने . वाहतूक मंद गतीने सुरु आहे. तर पश्चिम रेल्वेची वाहतूक पंधरा मिनिटे उशिराने आहे.
मुंबईला मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने तहिमान घातले आहे . त्यानंतर आज, शुक्रवारी सकाळपासूनच मुंबई आणि उपनगरांमध्ये पाऊस कोसळत आहे. गेल्या दोन-तीन तासांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने रस्त्यांवर पाणी साचले आहे. परिणामी रस्ते वाहतूक मंदावली आहे. (Mumbai Rain Updates)
रस्ते वाहतूक (Road Traffic) मंदावल्याने नागरिकांचे हाल झाले. मुसळधार पावसाचा (Heavy Rain) सर्वाधिक फटका पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीला बसला आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे हवेतील दृश्यमानता कमी झाल्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक साधारणपणे पंधरा ते वीस मिनिटे उशिराने सुरू आहे. विविध स्थानकांवर प्रवाशांची गर्दी देखील वाढली आहे.