NAMO Shetkari Yojana: नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा अखेर GR आला आहे. यामध्ये कोण शेतकरी पात्र असणार आहेत याची आपण आज माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो मराठी योजना मध्ये तुमचे स्वागत आहे. अखेर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेची अंमलबजावणी करण्याचा अखेर जीआर आला आहे.
यामध्ये पण शेतकरी पात्र असणार आहेत तसेच हप्ते कधी मिळणार व योजनेचे कार्यपद्धत काय असणार याबाबतचे संपूर्ण माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे. याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
सन 2023-2024 या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे अन्नदाता शेतकऱ्याच्या उत्पन्न वाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे.
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना पात्रता
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पीएम किसान पोर्टलवर नोंदणी केलेले व केंद्र शासनाच्या निकषानुसार लाभास पात्र ठरलेले सर्व लाभार्थी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील.
- पी एम किसान पोर्टलवर नव्याने नोंदणी होऊन लाभ मिळालेले पात्र लाभार्थी देखील या योजनेचे लाभार्थी राहतील.
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना कार्यपद्धत
- PM किसान योजनेच्या PFMS प्रणालीनुसार प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभास पात्र ठरलेले लाभार्थी नमो शेतकरी महा सन्माननिधी योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील.
- सदर लाभार्थ्यांना राज्य शासनामार्फत विकसित करण्यात येणाऱ्या पोर्टलवरून प्रणाली वरून बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे निधी जमा केला जाईल
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना हप्ते
अ.क्र. | हप्ता क्रमांक | कालावधी | रक्कम |
1 | पहिला हप्ता | माहे एप्रिल ते जुलै | रु. 2000/ |
2 | दुसरा हप्ता | माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर | रु. 2000/ |
3 | तिसरा हप्ता | माहे डिसेंबर ते मार्च | रु. 2000/ |
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना GR पाहण्यासाठी इथे क्लिक करा
1 thought on “NAMO Shetkari Yojana: नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा अखेर GR आला, पहा कोण पात्र ?”